“आग लाव्या” हे महाराष्ट्रातील निर्भीड, बेधडक आणि लोकशाहीला आवाज देणारे एक अग्रगण्य डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. सत्तेच्या सतरंजीत दडलेले खेळ उघड करणं, जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणं आणि निष्पक्ष पत्रकारितेला हातभार लावणं हा आमचा मुख्य उद्देश आहे.
आमच्या प्लॅटफॉर्मवर पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक—सर्वांना त्यांच्या माहितीसाठी, मतांसाठी आणि अधिकृत बाजूसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध आहे.
तुम्ही तुमच्या संस्थेची अधिकृत माहिती, योजना, प्रेस नोट्स, कार्यक्रम तपशील किंवा व्यवस्थापनाची बाजू आम्हाला अधिकृत लेटरहेडवर किंवा अधिकृत ईमेल आयडीवरून पाठवू शकता.
आम्ही तुमच्या मतांचा, सूचनांचा आणि भावना यांचा मनापासून आदर करतो. सत्यावर आधारित माहिती देणं आणि तिचं संरक्षण करणं ही आमची सर्वात मोठी जबाबदारी आहे.
राज्यातील सर्व पत्रकारांना आवाहन —
“आग लाव्या” तुम्हाला निष्पक्ष आणि धाडसी पत्रकारितेसाठी एक विश्वासार्ह माध्यम देते. कृपया तुमची थेट, पडताळणी केलेली आणि विश्वासार्ह माहिती आम्हाला पाठवा. आम्ही प्राप्त झालेल्या सर्व माहितीबाबत पूर्ण गोपनीयता पाळण्याचं वचन देतो.
तुम्ही आम्हाला खालील ईमेलवर संपर्क करू शकता:
